Written by students who passed Immediately available after payment Read online or as PDF Wrong document? Swap it for free 4.6 TrustPilot
logo-home
Class notes

BA 1st year history study notes

Rating
-
Sold
-
Pages
30
Uploaded on
28-05-2025
Written in
2024/2025

Easily study and understanding notes for BA 1st year history students.

Institution
Course

Content preview

आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज
विषय – मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ. स.1206 ते 1707 पर्यंत)
प्रा. अमोल गुरुदास बोरकर
युनिट १

१. सुलतानशाहीच्या कालखंडाचे साहित्यिक साधने

प्रस्तावना :-

1. अरबांच्या सिंध प्रांतावरील स्वारीपासून भारतावर मुस्लीमांची आक्रमणे सुरू झालीत. इ.स. ७१२ मधील
महंमद बीन कासीमची सिंधवरील स्वारी ही भारतावरील मुस्लीमांची पहिली मोठी स्वारी होती.
2. अरबानंतर तुर्कीनी भारतावर आक्रमणे केलीत. इ.स. १००० ते १०२७ या सत्तावीस वर्षांच्या कालखंडात
महंमद गझनीने भारतावर एकूण सतरा स्वाऱ्या केल्या. महंमद गझनीच्या स्वाऱ्यानंतर सुमारे दीडशे वर्षांनी
म्हणजे इ.स. ११७५ पासून महंमद घोरीची भारतावरील आक्रमणे सुरू झाली.
3. महंमद घोरीच्या मृत्यूनंतर त्याचा सरदार कुतुबुद्दीन ऐबक याने दिल्ली येथे इ.स. १२०६ मध्ये स्वतंत्र मुस्लीम
सत्तेची स्थापना केली. इ.स. १२०६ ते १५२६ या कालखंडात दिल्ली येथे गुलाम, खिलजी, तुघलक, सैय्यद
आणि लोदी या पाच वंशातील शासकांनी राज्य केले .
4. या पाचही वंशातील शासकांनी स्वतःला सुलतान म्हणवून घेतले . त्यामुळे इ.स. १२०६ ते १५२६ या
कालखंडाला सुलतानशाहीचा कालखंड असे म्हणतात.
5. सुलतानशाही कालखंडाच्या इतिहासाची माहिती मिळण्याकरीता अनेक ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत.
त्या साधनांचे वर्गीकरण प्रामुख्याने तीन प्रकारात करता येते.
6. अ) दरबारी ले खकांच्या तवारीखा किं वा अरबी फारसी भाषेतील साधने . ब) परकीय प्रवाशांचे प्रवास
वृत्तांत. क) धार्मिक ग्रंथ ड) प्रादे शिक ग्रंथ इत्यादी सुलतानशाहीच्या इतिहासाची माहिती देणारे
साहित्यिक साधने प्रामुख्याने फारसी भाषेत असून काही प्रमाणावर अरबी व तुर्की भाषेतही आहेत.
7. या सर्व साहित्याचे इंग्लिश व काही भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले असल्याने भारतीय अभ्यासकांना
मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणे सुलभ झाले आहे .
8. सुलतानशाहीचा इतिहास लिहिणारे बहुतांशी ले खक परकीय होते. शास्त्रशुद्ध इतिहास कसा लिहावा याची
त्यांना माहिती नव्हती. त्यामुळे त्यांचे लिखाण ऐतिहासिक पुराव्यांच्या इतर कसोट्यांवर पारखून घ्यावे
लागते.

अ) तवारीखा / इतिहास ग्रंथ :- सुलतानशाहीचा इतिहास समजण्यासाठी, त्याकाळातील दरबारी ले खकांनी
फारसी व अरबी भाषेत लिहिले ल्या 'तवारीखा' विशेष महत्त्वाचे साधनग्रंथ म्हणून उपयुक्त ठरतात. सुलतानशाहीचा
इतिहास समजून घेण्यासाठी खालील तवारीखा किं वा इतिहास ग्रंथ उपयुक्त ठरतात.

,१. चचनामा :

1. भारतातील अरब आक्रमणाच्या वेळी, भारताच्या सिंध प्रांतावर राज्य करणाऱ्या राजवंशाचा इतिहास जाणून
घेण्यासाठी 'चचनामा' हा अत्यंत महत्त्वाचा मूलभूत ग्रंथ आहे .
2. सिंध येथे राजवंशाची स्थापना करणाऱ्या 'चच' या राजांच्या नावावरून या ग्रंथाला चचनामा हे नाव देण्यात
आले . मूळ अरबी भाषेत लिहिला गेलेला हा ग्रंथ कोणी व केव्हा लिहिला हे निश्चित समजत नाही.
3. सिंधचा पहिला मुस्लीम विजेता महंमद बीन कासीम याच्या सकीफी जमातीत जन्मले ल्या अलोरच्या
काजीकडू न मिळाले ल्या याच्या मूळ अरबी हस्तलिखिताचा अली कूफी याने इ.स. १२१६ च्या सुमारास
फारसी भाषेत अनुवाद केला. अलोरच्या काजीचे म्हणणे आहे की, हा ग्रंथ त्याच्या पूर्वजांनी लिहिला.
सिंधचा इतिहास व अरबांचा विजय सांगणारा हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे.




२. ताजुल मासिर :

1. ताजुल मासिर हा ग्रंथ हसन निझामी याने लिहिला. हसन निझामी महंमद घोरीच्या स्वाऱ्यांच्यावेळी भारतात
आला आणि पुढे तो येथेच स्थायिक झाला.
2. इ.स. ११९२ ते इ.स. १२२८ पर्यंतच्या अर्थात कुतुबुद्दीन ऐबक व शमसुद्दीन अल्तमश या गुलाम
घराण्यातील पहिल्या दोन शासकांच्या कारकिर्दीचे वर्णन या ग्रंथात मिळते.

३. तबकात-ए-नासिरी :

1. मिनहाज-उस-सिराज याने तबकात-ए-नासिरी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात महंमद घोरीचा भारत विजय
आणि भारतातील तुर्की राज्याच्या स्थापनेपासून ते इ.स. १२६० पर्यंतच्या घटनांची माहिती मिळते.
2. सोबतच तत्कालीन इतर मुसलमानी दे शांचाही इतिहास या ग्रंथात पाहावयास मिळतो. मिनहाज-उस-सिराज
काही काळ ताजुद्दीन एल्दोजकडे, नंतर सिंधमध्ये नासिरुद्दीन कुबाचाकडे आणि पुढे शमसुद्दीन अल्तमशकडे
राहिला होता.
3. अल्तमशच्या मृत्यूनंतरच्या सर्व घटना त्याने प्रत्यक्षपणे पाहिल्या होत्या. रझिया सुलतानची त्याच्यावर कृपा
होती. रझियानंतर गादीवर आले ल्या नासिरुद्दीन महंमदच्या काळात मिनहाज-उस-सिराजने या ग्रंथाचे
ले खन केले आणि हा ग्रंथ त्याने नासिरुद्दीनलाच अर्पण केला.
4. महंमद घोरी, अल्तमश, रझिया, बल्बन या सर्व शासकांची त्याने प्रशंसा केली आहे . घटनांची क्रमबद्ध
वर्णन या ग्रंथात आढळतात. या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद राबर्टी याने केला, मिनहान-उस-सिराजचा दृष्टीकोन
पक्षपाती असल्यामुळे या ग्रंथातील सर्वच माहिती सत्य म्हणून स्वीकारता येत नाही.

, ४. खजायन-उल-फतूह :

1. सुलतानशाहीच्या काळातील सुप्रसिद्ध कवी, विद्वान अमीर खुसरौ हा या ग्रंथाचा ले खक होता. अमीर
खुसरीचा जन्म भारतातच झाला. (पटियाली, उत्तरप्रदेश) त्याचे वडील अमीर सैफुद्दीन महमूद हे
तुर्क स्तानातील सरदार होते.
2. ते अल्तमशच्या काळात भारतात येऊन स्थायिक झाले . अमीर खुसरौची आई भारतीयच होती. खुसरौ दहा
वर्षाचा असतांनाच त्याचे वडील वारले . आजोबांनी व आईने त्याचे पालन पोषण केले . लहानपणीच खुसरौ
निजामउद्दीन औलिया या सत्पुरुषाचा अनुयायी बनला.
3. त्याच्याबाबत खुसरौला नितांत आदर व प्रेम होते. कुशाग्र बुद्धिमत्ता व संपन्न प्रतिभा त्याला लाभली होती.
त्याने लहानपणीच कविता करावयास सुरुवात केली. फारसी, अरबी, तुर्की आणि हिंदी या भाषा त्याने
आत्मसात केल्या.
4. बल्बन, कैकुबाद, अल्लाउद्दीन खिलजी, गियासुद्दीन तुघलक या सुलतानांच्या राजदरबारात राजकवी
म्हणून त्याचे बरे च आयुष्य व्यतीत झाले . त्याने विपूल व दर्जेदार काव्यनिर्मिती केली. तो फारसीतील
प्रख्यात कवी तर होताच परं तु भाषाशास्त्रज्ञ, संगीतकार, गूढवादी व अष्टपैलू विद्वान म्हणूनही त्याने कीर्ती
संपादन केली.
5. हिदुस्थानी संगीतात त्याने उल्ले खनीय भर घातली. इराणातील फारसी विद्वान त्याचा 'तूती-ए-हिंद'
(भारताचा पोपट) म्हणून गौरव करीत.
6. अमीर खुसरौ याने पाच कविता संग्रह (दीवान), पाच ऐतिहासिक खंडकाव्ये (तारीखी मस्नवियाँ) आणि तीन
गद्य ग्रंथ लिहिले . त्याच्या तीन गद्य ग्रंथांपैकी अल्लाउद्दीन खिलजीच्या काळाचा इतिहास सांगणारा
'खजायन-उल-फतूह' हा ग्रंथ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा ग्रंथ आहे . या ग्रंथावरून अल्लाउद्दीन खिलजीच्या
कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटनांची प्रमाणभूत माहिती मिळते. 'एजाजे-खुसरवी', तारीखे अलाई' आणि
'तुघलकनामा' हे त्याचे अन्य ऐतिहासिक ग्रंथ होते.




५. तारीख-ए- फिरोजशाही (बर्नीकृत) :

1. तारीख-ए-फिरोजशाही या ग्रंथाचा ले खक जियाऊद्दीन बर्नी हा होता. बर्नीगियासुद्दीन तुघलक, महंमद व
फिरोजशहा तुघलक यांचा समकालीन होता.
2. बनींच्या या ग्रंथात सुलतानशाहीच्या सुमारे शंभर वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला आहे . यात
नासिरुद्दीन महंमदपासून ते फिरोजशहा तुघलकापर्यंतच्या एकूण नऊ सुलतानांच्या कारकिर्दीचा आढावा
घेण्यात आला आहे .

Written for

Course

Document information

Uploaded on
May 28, 2025
Number of pages
30
Written in
2024/2025
Type
Class notes
Professor(s)
Ba 1st year graduation degree
Contains
B.a 1st year semester second

Subjects

$22.39
Get access to the full document:

Wrong document? Swap it for free Within 14 days of purchase and before downloading, you can choose a different document. You can simply spend the amount again.
Written by students who passed
Immediately available after payment
Read online or as PDF

Get to know the seller
Seller avatar
ajpscwohh

Get to know the seller

Seller avatar
ajpscwohh Gondwana University
Follow You need to be logged in order to follow users or courses
Sold
-
Member since
11 months
Number of followers
0
Documents
1
Last sold
-

0.0

0 reviews

5
0
4
0
3
0
2
0
1
0

Recently viewed by you

Why students choose Stuvia

Created by fellow students, verified by reviews

Quality you can trust: written by students who passed their tests and reviewed by others who've used these notes.

Didn't get what you expected? Choose another document

No worries! You can instantly pick a different document that better fits what you're looking for.

Pay as you like, start learning right away

No subscription, no commitments. Pay the way you're used to via credit card and download your PDF document instantly.

Student with book image

“Bought, downloaded, and aced it. It really can be that simple.”

Alisha Student

Working on your references?

Create accurate citations in APA, MLA and Harvard with our free citation generator.

Working on your references?

Frequently asked questions